पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी योग साधनेचे महत्त्व केले अधोरेखित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी योग साधनेच्या महत्त्वावर सहमती दर्शवली आहे. योग दिवस आपल्या सर्वांना एकत्र आणेल आणि पृथ्वी ग्रहाच्या आरोग्यात सुधारणा घडवेल अशी सदिच्छाही पंतप्रधान मोदी यांनी वक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव म्हणाले की, विभागल्या गेलेल्या जगात, योग सराव जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणत असून, त्यांच्यासाठी तो सामर्थ्य, सौहार्द आणि शांततेचा स्रोत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“योग साधनेच्या महत्त्वावर @UN महासचिव @antonioguterres यांच्याशी पूर्ण सहमत आहे. योग दिवस आपल्या सर्वांना जवळ आणेल आणि आपल्या ग्रहाचे आरोग्य सुधारेल.”