NewsExpress

News Express - Crisp Short Quick News
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमा शुल्क विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाच्या लेखापरीक्षण १ आणि लेखापरीक्षण २ आयुक्तालयांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

कार्यक्रमात वस्तू व सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. के. एन. राघवन, संजय महेंद्र, व्ही.एन. थेटे, दिलीप गोयल, रवींद्र डांगे, भूपेंद्र सिंह सुहाग, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ अशी आहे. यावेळी सर्व सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांनी निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याची शपथ घेतली.