केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हरियाणामधील सोनीपत, कर्नाल आणि अंबाला येथे 3,835 कोटी रुपये खर्चाच्या चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज हरियाणामधील सोनेपत, कर्नाल आणि अंबाला येथे 3,835 कोटी रुपये खर्चाच्या चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

दिल्ली ते पानिपत या आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग क्र.44 वर सोनीपत येथे 890 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या एकूण 24 किलोमीटर लांबीच्या 11 फ्लायओव्हर्समुळे हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथील आर्थिक केंद्रांकडे पोहोचण्यासाठी अधिक उत्तम सोय होईल. हा दिल्ली-पानिपत महामार्ग कृषी क्षेत्रांना औद्योगिक क्षेत्रांशी जोडून, वस्तू आणि उत्पादने यांच्या सुलभ वाहतुकीची सुविधा निर्माण करेल. दिल्ली-पानिपत मार्गिकेमध्ये निर्माण झालेल्या या नव्या सुविधेमुळे हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीर या भागांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण होईल.

राष्ट्रीय महामार्गांची उभारणी, 1690 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा कर्नाल ग्रीनफिल्ड येथील 35 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रिंग रोड आगामी काळात या भागात विकास आणि समृद्धी आणणारी जीवनवाहिनी ठरेल.