आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित जनजागृती कार्यक्रम व योग दिंडीचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, औरंगाबाद शहरातील सर्व योग संस्थांचे एकत्रित योग संवर्धन संस्था, भारतीय योग संवर्धन संस्था, शाखा-औरंगाबाद, मुंबई ओनकोकेअर सेंटर तसेच जिल्हा प्रशासन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सिडको, औरंगाबाद येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या कार्यक्रमाचे व योग दिंडीचे उदघाट्न केले.

संजय औरंगाबादकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांकडून योग अभ्यास करून घेतला. डॉ. भागवत कराड, संतोष देशमुख व डॉ. प्रकाश देवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

औरंगाबाद शहरात सिडकोतील विविध रस्त्या-वस्त्यातून योग दिंडी/रॅली फिरून पुन्हा बळीराम पाटील विद्यालय येथे समाप्त करण्यात आली. कार्यक्रमात पिस योग अॅकॅडमी ने योग प्रात्यक्षिक सादर केले. बळीराम पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोरा प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, योग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष, गोपाल कुलकर्णी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरचे अध्यक्ष व भारतीय योग संस्थान, शाखा-औरंगाबादचे उत्तम काळवणे, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख व जिल्हा परिषद औरंगाबादचे आयुष समन्वयक अधिकारी, शकील अहमद, बळीराम पाटील विद्द्यालयाचे कोषाध्यक्ष डॉ. बिपीन राठोड, मुंबई ओनकोकेअर सेंटरचे डॉ. प्रकाश देवडे आदी उपस्थित होते.